anmol vachan in hindi अच्छे अनमोल वचन

anmol vachan in hindi अच्छे अनमोल वचन

अच्छे अनमोल वचन anmol vachan in hindi :  सकारात्मक रहे.... रचनात्मक बने।

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता ? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण

अत्तर लावताना लावणाऱ्या च्याही हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे, दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते. 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

माणसाच्या परिचयाची सुरुवात​ जरी चेहर्‍याने होत असली तरी,​ त्याची संपूर्ण ओळख​ वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.​ कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर​ फारसं मनावर घेवु नये कारण,​ या जगात असा कोणीच नाही​ ज्याला सगळे चांगलं म्हणतील.​ 

इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल

"एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल." 

आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल 

जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा

आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात, कारण हे कलियुग आहें, इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो.

आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय,समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.

पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.

आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं.. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं.. 

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.